ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (मराठी )
आकलन - संवाद व त्यावर आधारित प्रश्न
संवाद:अमोल:"अरे बापरे! सुजय, हे काय तुझ्या अभ्यासाच्या टेबलावरचं चित्र? की पुस्तकांचं कुरुक्षेत्र?"

सुजय:"अरे अमोल, परीक्षेला आता फक्त दोन दिवस उरलेत ना, मग हे असं होणारच!"

अमोल:"दोन दिवसात कुरुक्षेत्र जिंकता येतं का? वर्षभर तू फक्त मैदानावरच बॅटिंग करत होतास ना?"सुजय:"थट्टा पुरे कर. आता रात्रभर जागून नोट्स काढतोय मी. तेवढ्यात समीर आला होता, म्हणला - 'तुला हवी ती मदत मी करतो'."

अमोल:"समीर? जो स्वतः गणिताच्या पेपरमध्ये शून्याचा शोध लावून आलाय? त्याच्या मदतीने तू फक्त शून्यापर्यंतच पोहोचशील."

सुजय:"जाऊ दे रे, मी माझं बघून घेईन. तू कशाला आला होतास?"

अमोल:"मी तर तुला गणिताची सुटलेली 'प्रमेये' द्यायला आलो होतो, पण तुझ्या टेबलावरची स्थिती पाहून वाटतंय, तुला आधी 'शांतता' या विषयाची गरज आहे!"
 
⁠⁠⁠⁠⁠⁠⁠
सुजय सध्या काय करत आहे?
a :
नोट्स काढत आहे.
b :
खेळायला जात आहे.
c :
समीरची वाट पाहत आहे.
d :
झोपला आहे.
Explanation :
सुजय म्हणतो, 'आता रात्रभर जागून नोट्स काढतोय मी', यावरून तो सध्या अभ्यासाच्या नोट्स काढण्याचे काम करत आहे.
INSTALL APP