ज्या अपूर्णांकांचा छेद 10, 100 किंवा 1000 असतो, त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. पूर्ण संख्या आणि अपूर्णांक भाग वेगळा करण्यासाठी दशांश चिन्हाचा (.) वापर केला जातो.
दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिल्या घराला 'दशांश' स्थान म्हणतात आणि दुसऱ्या घराला 'शतांश' स्थान म्हणतात.
7/10 हा अपूर्णांक 0.7 असा लिहिला जातो. याचे वाचन 'शून्य दशांश सात' असे करतात.
जेव्हा छेद 10 असतो, तेव्हा उजवीकडून एक घर सोडून दशांश चिन्ह द्यावे. जेव्हा छेद 100 असतो, तेव्हा दोन घरे सोडून चिन्ह द्यावे.
दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह न मांडल्यामुळे बेरीज किंवा वजाबाकीमध्ये चुका होतात. नेहमी रिकाम्या जागी 0 लिहावा.
दशांश अपूर्णांक लिहिताना दशांश चिन्हाचा वापर होतो. बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश चिन्हांची एकाखाली एक मांडणी करणे आवश्यक आहे.